पेठ तालुक्यातील ग्रामीण भागात डिजिटल साक्षरता अभियान - Digital literacy campaign in rural areas of Peth taluka

पेठ तालुक्यातील ग्रामीण भागात डिजिटल साक्षरता अभियान

पेठ तालुक्यातील ग्रामीण भागात डिजिटल साक्षरता अभियान - Digital literacy campaign in rural areas of Peth taluka


तालुका पेठ बातमीपत्र ता.2

पेठ तालुक्यातील ए पी जे कॉम्पुटर इन्स्टिट्यूट करंजाळी यांच्या मार्फत दिनांक 10 ऑक्टोबर २०२३ ते 26 ऑक्टोबर २०२३ दरम्यान डिजिटल साक्षरता अभियान राबवण्यात आले. या अभियानात डोल्हारमाळ, धाब्याचा-पाडा, सांबर-पाडा, पातळी, आड या गावात जाऊन ए पी जे कॉम्पुटर इन्स्टिट्यूट करंजाळी यांनी मिटिंग घेऊन केंद्र सरकारने चालू केलेल्या सर्व योजनांचे तसेच काढायला सांगितलेल्या सर्व डिजिटल कार्डांचे महत्व, फायदे व अमलात आणण्याची पद्धत लोकांना समजावून सांगितली.

या अभियानात ए पी जे कॉम्पुटर इन्स्टिट्यूट करंजाळी चे मालक श्री जितेंद्र देवराम गवळी यांनी लोकांना समजेल अश्या स्थानिक मराठी भाषेत लोकांना समजावून सांगितले. त्यांनी आधारकार्ड, पॅनकार्ड, आभाकार्ड, आयुष्मान भारत कार्ड, इ श्रम कार्ड, ए टी एम कार्ड, ऑनलाईन पैशाचा व्यवहार, ऑनलाईन रेशनकार्ड व रेशनिंग यांचे महत्व, फायदे व अमलात आणण्याची पद्धत लोकांना समजावून सांगितली.

या अभियानात मोफत पॅन कार्ड कॅम्प घेऊन जवळपास 368 लोकांचे पॅन कार्ड
मोफत काढून देण्यात आले. या अभियानामुळे ग्रामीण भागातील लोकांना डिजिटल क्षेत्रात
सजग होण्यास मदत झाली आहे.

अभियानाचे उद्दिष्ट:

या अभियानाचे उद्दिष्ट ग्रामीण भागातील लोकांना डिजिटल क्षेत्रात
सजग करणे आणि त्यांना केंद्र सरकारच्या योजनांचा लाभ घेण्यास मदत करणे हे आहे.

अभियानाचे परिणाम:

या अभियानामुळे ग्रामीण भागातील लोकांना डिजिटल क्षेत्रात सजग
होण्यास मदत झाली आहे. त्यांना केंद्र सरकारच्या योजनांचा
लाभ घेण्यास मदत झाली आहे. तसेच त्यांना डिजिटल कार्ड काढण्याची प्रक्रिया समजली
आहे.

अभियानाचे भविष्य:

या अभियानाचा भविष्यातही कायम टिकून
राहील. या अभियानातून मिळालेल्या अनुभवांचा उपयोग करून या अभियानाला आणखी व्यापक
करण्यात येईल.

 

Post a Comment

Previous Post Next Post