सुरगाण्याच्या दिलीप गावितची सुवर्ण कामगिरी
नाशिक जिल्ह्यातील सुरगाणा तालुक्यातील तोरणडोंगरी येथील आदिवासी खेळाडू दिलीप महादू गावित यांनी आशियाई पॅरा गेम्स 2023 मध्ये पुरुषांच्या 400 मीटर T47 स्पर्धेत सुवर्णपदक जिंकून इतिहास रचला आहे.
गावित यांना उजव्या हाताचा कोपर अपूर्ण आहे. तरीही, त्यांनी या आव्हानाला तोंड देत सुवर्णपदक जिंकले. त्यांची ही कामगिरी देशभरातील तरुणांसाठी प्रेरणादायी आहे.
गावित यांच्या कामगिरीचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनीही कौतुक केले आहे. त्यांनी ट्विट करून गावित यांना अभिनंदन केले आहे.
गावित यांच्या या कामगिरीमुळे भारताने आशियई पॅरा गेम्स 2023 मध्ये 100 पदके जिंकून इतिहास रचला आहे.

Post a Comment