विश्वचषकातील भारतीय संघाला दुखापतीचा मोठा झटका हार्दिक पंड्या संघातून बाहेर
हार्दिक पंड्या बाहेर, प्रसिध कृष्णा
संघात
युएईतील विश्वचषक स्पर्धेत भारतीय
संघाला मोठा धक्का बसला आहे. अष्टपैलू खेळाडू हार्दिक पंड्या दुखापतीमुळे स्पर्धेतून
बाहेर पडला आहे. त्याच्या जागी वेगवान गोलंदाज प्रसिध कृष्णाला टीम इंडियात स्थान
मिळाले आहे.
बांगलादेशविरुद्धच्या सामन्यात
हार्दिकच्या घोट्याला दुखापत झाली होती. त्यानंतर तो संघाबाहेर होता. हार्दिकला
सेमी फायनलपर्यंत बरा होण्याची आशा होती,
परंतु ती आशा फोल ठरली.
प्रसिध कृष्ण हा भारतीय क्रिकेट
संघाचा एक अनुभवी वेगवान गोलंदाज आहे. तो जवळपास वर्षभर दुखापतग्रस्त होता. आशिया
चषक स्पर्धेतही तो भारतीय संघाचा भाग होता. विश्वचषकापूर्वी भारतीय संघ
ऑस्ट्रेलियासोबत एकदिवसीय मालिका खेळला होता. त्यातही
प्रसिद्ध संघामध्ये होता.
प्रसिद्ध कृष्णाने भारतासाठी
आतापर्यंत १७ वनडे सामने खेळले आहेत. यात त्याने २९ बळी घेतले आहेत. 12 धावांत 4 बळी ही त्याची
सर्वोत्तम कामगिरी आहे. प्रसिद्ध कृष्णाला विश्वचषक स्पर्धेत संधी मिळाल्यास तो
भारतीय संघाला चांगली साथ देईल अशी अपेक्षा आहे.

Post a Comment