आताची मोठी बातमी: IPL 2024 च्या लिलावासाठी फ्रँचायझींना मिळाली मुदतवाढ
मुंबई इंडियन्सने रोमारियो शेफर्डची खरेदी केली
वनडे विश्वचषक स्पर्धा सुरू असताना IPL 2024 च्या लिलावाची तारीख आणि ठिकाण जाहीर झाले आहे. लिलाव 19
डिसेंबर रोजी दुबईतील कोका-कोला एरेना येथे होणार आहे. हा IPL इतिहासातील पहिला वेळ असेल जेव्हा लिलाव परदेशात होईल.
IPLच्या 10 संघांना 26 नोव्हेंबरपर्यंत त्यांच्या संघात कायम ठेवलेल्या खेळाडूंची यादी बीसीसीआयकडे सादर करावी लागेल. 15 नोव्हेंबर ही मुदत होती,
परंतु फ्रँचायझींच्या मागणीनुसार ती वाढवण्यात आली.
IPL 2024 साठी प्रत्येक संघाची सॅलरी कॅप 100 कोटी रुपये आहे. हे खेळाडूंच्या कराराचे हे तिसरे आणि शेवटचे वर्ष आहे. त्यानंतर पुढच्या वर्षी मेगा ऑक्शन होणार आहे.
आज मुंबई इंडियन्स आणि लखनौ सुपर जायंट्स यांच्यात एक ट्रेड झाला आहे. रोमारियो शेफर्ड आगामी हंगामासाठी लखनौ सुपर जायंट्समधून मुंबई इंडियन्समध्ये सामील होणार आहे. त्याच्या मूळ किमती 50 लाखांवर ही ट्रे़डिंग झाली आहे.
.png)
Post a Comment